सुभाष पवार करणार शिवसेनेत प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असल्याचे म्हटले जात आहे. 

 

सरळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र व ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. या गोष्टीला स्वत: सुभाष पवार यांनी दुजोरा दिला आहे. ठाणे जिल्ह्याचे  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असल्याचे म्हटले जात आहे. 

माजी आमदार गोटीराम पवार यांच्या निवडणुकीच्या वेळी त्यांची सर्व कामे त्यांचे पुत्र सुभाष पवार हे पाहत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सुभाष पवार यांचा सिहांचा वाटा असायचा, त्यामुळे सुभाष यांच्या पक्ष सोडण्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, सुभाष पवार हे शिवसेनेत येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे किती कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subhash Pawar to join Shiv Sena