15 दिवसांत हरकती सादर करा - म्हाडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई - म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे स्थापन केलेल्या बृहद्‌सूची समितीच्या सुनावणीत पात्र, अपात्र ठरलेले आणि निर्णय प्रलंबित असलेल्या एक हजार 111 अर्जदारांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत काही दावे, हरकती असल्यास ते यादी जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत मंडळाकडे सादर करावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे.
Web Title: Submit objections within 15 days mhada

टॅग्स