मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी सुबोध कुमार जैस्वाल?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पडसलगीकर ऑगस्टअखेरीस निवृत्त होतील. मात्र त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत पडसलगीकर महासंचालकपदी राहतील. जैस्वाल हे 1985 चे आयपीएस अधिकारी असून तेलगी प्रकरणासारखी महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपास त्यांचा सहभाग होता

मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सध्याचे मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती केवळ औपचारिकता राहिली आहे. अशा परिस्थितीत त्यांचा उत्तराधिकारी म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जैस्वास यांना मुंबई पोलिस आयुक्तपदाची सुत्रे देण्याची दाट शक्यता आहे. याबाबत शनिवारी सायंकाळी आदेश निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पडसलगीकर ऑगस्टअखेरीस निवृत्त होतील. मात्र त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत पडसलगीकर महासंचालकपदी राहतील. जैस्वाल हे 1985 चे आयपीएस अधिकारी असून तेलगी प्रकरणासारखी महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपास त्यांचा सहभाग होता.

Web Title: Subodh Kumar Jaiswal Mumbai police commissioner