रॉय यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई - सहारा समूहाचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्याविरोधात "सेबी'ने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान बजावण्यात आलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेण्यासाठी त्यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात हजेरी लावली. जामिनाच्या मुदतीत वाढ करण्यासाठी ते न्यायालयात आले होते. गेल्या वर्षी सत्र न्यायालयाने रॉय यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. कागदोपत्री कारवाई पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने हे वॉरंट रद्द केले.
Web Title: subrata roy oppose warrent cancel