महाडच्या चवदार तळ्यासाठी डिसेंबरपर्यंत अनुदान - महेता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - महाड येथील चवदार तळे परिसराचा विकास आणि तेथे सोई-सुविधा देण्यासाठी डिसेंबरपूर्वी अनुदान दिले जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री व रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी गुरुवारी (ता. 30) मंत्रालयात दिली.

चवदार तळ्यासंदर्भात कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुरुवारी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी वीर रेल्वेस्थानक ते क्रांती भूमीपर्यंत एसटी सेवा, आंबेडकरी अनुयायांना आरोग्य सुविधा, वीज, पाणी व निवाऱ्याची सोय, तळ्याचे सुशोभीकरण, भोजन व्यवस्था, भीमसृष्टी निर्माण करण्यास गती देणे, माता रमाई आंबेडकर विहार व छत्रपती शाहू सभागृहाची दुरुस्ती आदींसंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महेता यांना निवेदन दिले.

चवदार तळ्याचा विकास आणि अनुयायांना सोई-सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन निधी, जिल्हा परिषद व नगरपालिकेचा निधी दिला जाईल, असे महेता यांनी या वेळी सांगितले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: subsidy for mahad lake