esakal | नैराश्यावर मात! इंजिनिअर इरफानकडून फळविक्री करुन उदरनिर्वाह
sakal

बोलून बातमी शोधा

fruit stall

कोरोना काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. सुरुवातीला प्रचंड नैराश्‍यात असलेल्या इरफानने मात्र या परिस्थितीत न डगमगता कमी भांडवल वापरून फळविक्री करण्याचे काम करण्याचा पर्याय निवडला. 

नैराश्यावर मात! इंजिनिअर इरफानकडून फळविक्री करुन उदरनिर्वाह

sakal_logo
By
जतिन कदम

सफाळे : कोरोना आपत्कालीन काळात सर्वच क्षेत्रांतील तरुणांचे रोजगार बुडाले व त्यांच्यावर बेरोजगारीने आर्थिक संकट कोसळले. मुख्यतः हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. अशा प्रसंगी काय करावे, असा प्रश्‍न सफाळ्याच्या इंजिनिअर झालेल्या इरफान पटेल या तरुणाला पडला. या नैराश्‍येतून बाहेर पडत स्वतःची फळविक्री करण्याची हातगाडी सुरू केली. 

महत्त्वाची बातमी : 'लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट'; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालींवर राहील बारीक नजर

"कोणतेही काम हलके नसते' या विचारानुसार वाटचाल करणाऱ्या इरफान अयुब पटेलने स्वतः फळविक्रेता होण्याचे ठरवले. इरफान बी. टेक. टेक्‍स्टाईल इंजिनियर असून तो प्रभादेवी येथे ऑनलाईन ट्रेडिंग डिपार्टमेंटमध्ये चांगल्या हुद्द्यावर होता. कोरोना काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. सुरुवातीला प्रचंड नैराश्‍यात असलेल्या इरफानने मात्र या परिस्थितीत न डगमगता कमी भांडवल वापरून फळविक्री करण्याचे काम करण्याचा पर्याय निवडला. 

हे ही वाचा : "एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही"

लॉकडाऊनमध्ये हातावर हात धरून बसून राहण्यापेक्षा हा व्यवसाय करण्याचे निश्‍चित केले. या 20 दिवसांत खूप काही शिकता आले. ग्राहक नसल्यावर धैर्य न गमावता उन्हात उभे राहणे आता सोपे वाटायला लागले आहे. ग्राहकांशी भावतोल करायला शिकलो आहे. भविष्यात संधी मिळाली तर निश्‍चितच पुन्हा इंजिनिअर म्हणून काम करेन. 
- इरफान पटेल, सफाळे 

(संपादन : वैभव गाटे)

Subsistence by selling fruits from Engineer Irfan

loading image