चिमुकल्या ओंकार गायकवाडवर झाली यशस्वी शस्त्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

वाडा(पालघर)- वाडा तालुक्यातील कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणा-या कुयलू या गावातील एका गरीब कुटुंबातील चिमुकल्या ओंकार गायकवाड याच्या हृदयाला छिद्र होते. एका शिबिरात हा आजार निष्पन्न झाल्याने वाडा आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी त्याला ठाण्याच्या एका नामांकित रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने ओंकारचे हदय आता पुन्हा जोमाने धडधडू लागले.  

ओंकार वडिल विनोद गायकवाड असून, घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. त्यामुळे कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करावी लागते. सध्या विटभट्टीवर ते काम करतात. ओंकार हा 2 वर्षे 10 महिन्याचा असून, त्याला हृदयाचा आजार होता. विनोद यांनी त्याला मानव विकासच्या एका शिबिरामध्ये तपासणीसाठी नेले असता, डॉ. विनय पाटील, डॉ. जितेंद्र पाटील यांनी त्याची तपासणी केली. त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. 

त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी.डी.सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भस्मे, डॉ. मिनल पाटील व कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी ओंकार याला ठाणे येथील ज्युपीटर या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याची तपासणी करून त्याच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ओंकारचे हदय पुन्हा जोमाने धडधडू लागले आहे. 

शासनाच्या जीवनदायी आरोग्य योजनेतून ओंकारवर ही मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

Web Title: Successful surgery on omkar gayakwad