वाघावर "यश'स्वी शस्त्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश या नऊ वर्षांच्या वाघावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व पथकाने यशच्या तोंडाजवळ आलेली अडीच इंचाची गाठ यशस्वीरीत्या काढली. 

यश या वाघाच्या तोंडाजवळ महिन्याभरापूर्वी गाठ येत असल्याचे आमच्या लक्षात आले. ही गाठ थोडी वाढल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल दोन तास चालली. हा गाठीचा भाग तपासणीसाठी दिला असता त्यात कर्करोग आढळला नाही, असे उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. ही गाठ वाढू दिली असती तर यशला कर्करोगाचा धोका उद्भवला असता असेही ते म्हणाले. त्याला आठवडाभर विश्रांती दिली जाणार असून त्यानंतर तो पर्यटकांना पाहायला मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली. 

शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी पहिल्यांदाच गॅस अनेस्थेशियाचा वापर करण्यात आला. पारंपरिक पद्धतीऐवजी तोंडातून नळीवाटे गॅस अनेस्थेशिया दिला जातो, असेही डॉ. पेठे म्हणाले. यशला वैद्यकीय पिंजऱ्यात ठेवले असून हा पिंजरा सफारी भागापासून दूर आहे. 

Web Title: Successful surgery on tiger in mumbai