पाणीयोजनेमुळे महिलांच्या डोक्‍यांवरील हंडा उतरला 

नीलेश दिवटे
शनिवार, 19 मे 2018

कर्जत - सतत दुष्काळी व पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य ही कर्जतची ओळख पुसली जात आहे. पिढ्यान्‌ पिढ्या पाहिले गेलेले शुद्ध व नळाद्वारे घरपोच पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी अठ्ठावीस कोटींची योजना पूर्ण झाल्याने महिलांच्या डोक्‍यांवरील हंडा उतरला आहे.

कर्जत शहराची पाणीटंचाईग्रस्त शहर म्हणून ओळख झाली होती. येथील पाणीप्रश्नासाठी उदंड आंदोलने झाली; परंतु प्रश्‍न सुटत नव्हता. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यानंतर तरी पाणीप्रश्‍न सुटेल, अशी नागरिकांना आशा होती. नगरपंचायतीने कर्जतमधील पाणीप्रश्‍न सुटण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानामधून 28 कोटी रुपये मंजूर केले. या योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा रविवारी (ता. 20) होणार आहे. 

कर्जतकरांना शुद्ध व घरपोच पाणी देण्याचे निवडणुकीत दिलेले आश्वासन सत्यात उतरत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवकांचे व नागरिकांचे सहकार्य लाभले आहे. शहरासाठी स्मशानभूमी, बाग, चौकसुशोभीकरण, अभ्यासिका आदी कामे प्राधान्याने पूर्ण करू.
- नामदेव राऊत, नगराध्यक्ष, कर्जत 

Web Title: successful water irrigation in karjat