'ते' कोव्हिड केअर सेंटर अद्ययावत ठेवण्याच्या पालकमंत्री आदिती तटकरेंच्या प्रशासनाला सूचना

corona
corona

पाली : सुधागड तालुक्यातील वावळोली आश्रमशाळा येथील 100 खाटांची व्यवस्था असलेल्या कोव्हिड केअर सेंटरला पालकमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी (ता.14) सायंकाळी भेट दिली. हे कोव्हिड केअर सेंटर अद्ययावत ठेवावे, अशा सूचना त्यांनी पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिल्या. तसेच कोरोनाशी लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी असे सांगितले.      

यावेळी प्रांत अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसिलदार दिलीप रायन्नावार, अन्य तालुकास्तरीय अधिकारी  उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सुधागड तालुक्याच्या संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला. आणि तालुका प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या. यावेळी त्यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा लढा देताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे सांगून नागरिकांनी कोरोना विषाणूबाबत काळजी करू नका तर काळजी घ्या, अनावश्यक घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, स्वच्छता या बाबीही कटाक्षाने पाळा,असे आवाहन केले.

यावेळी तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी पालकमंत्री तटकरे यांना सांगितले की, सुधागड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तालुक्यात मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींची संख्या 9 हजार 227 असून या सर्व नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. तालुक्यात कामानिमित्त इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची संख्या 7 हजार 313 असून त्यांना स्वगृही परत आणण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.  

Sudha Vavloli Ashram School's covid Care Center Updated Postway, Aditya Tatkare Suggestions to Administrator

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com