आत्महत्येपासून परावृत्त केल्यानंतर तिचे प्रेमाचे नाते रेल्वे रुळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

आत्महत्येपासून परावृत्त केल्यानंतर तिचे प्रेमाचे नाते रेल्वे रुळावर

मुंबई : प्रेमभंगातून होणाऱ्या आत्महत्येच्या घटना आपण अनेक चित्रपटातून पाहतो; मात्र,मुंबईच्या भायखळा रेल्वे स्थानकात एका गर्भवती तरुणीने प्रेमभंगातून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधाने परिस्थितीला हाताळत आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे या तरुणीचा जीव वाचला. इतकेच नव्हे तर, पोलिसांनी प्रियकराला बोलवून दोघांची समजूत काढून या प्रेमी युगलाचे नाते रेल्वे रूळावर आणले.

भायखळा रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी एक तरुणी आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रूळावर उतरली होती. लोकल येत असताना ती रेल्वे रूळावरून रेल्वेकडे चालत गेली. त्यावेळी सहाय्यक उप निरीक्षक रवींद्र सानप आणि सुरक्षा रक्षक गजानन मुसळे हे तिच्याकडे पळत गेले अन तिला बाजूला केले. त्यामुळे या मुलीचा जीव वाचला. तिला रुळावरून हटवून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले त्यानंतर लोकल निघून गेली. मात्र नंतर ती मुलगी अप मार्गावर प्लॅटफॉर्म ०२ कडे चिंचपोकळी स्थानकावरून येणाऱ्या गाडीच्या दिशेने धावू लागली. त्याचवेळी सानप यांनी तत्परता दाखवत तिच्या मागे धावत समोरून येणाऱ्या लोकल ट्रेनला हात उंचावून तिला थांबवण्याचा इशारा केला, यावर समोरून येणाऱ्या लोकलच्या लोको पायलटला ही मुलगी धावत येताना दिसली. गाडी त्या मुलीच्या जवळ येत असल्याचे पाहून सानप यांनी मुलीचा हात पकडून तिला अप मार्गामधून बाहेर काढले, त्याचवेळी त्यांच्या पासून थोड्या अंतरावर लोकल थांबली.सानप यांच्या तत्परतेमुळे तिचे प्राण वाचले.

लग्नचा नकारामुळे टोकाचे पाऊल-

गेल्या काही वर्षापासून या तरुणीच एका मुलांबरोबर प्रेम प्रकरण सुरू होते. या प्रेमामध्ये ती तरुणी गर्भवती राहिली. तरुणीने आपल्या प्रियकराला लग्नासाठी आग्रह धरला होता. मात्र तरुण काही दिवस थांब नंतर आपण लग्न करू असे आपल्या प्रियसीला सांगत होता. तरीही तरुणी ऐकायला तयार नसल्याने या प्रेमीयुगलांचे भांडण झाले. भांडणानंतर यातरुणीने आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलले. प्रसंगावधाने परिस्थितीला हाताळत आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे या तरुणीचा जीव वाचला. विशेष म्हणजे,पोलिसांनी तिच्या प्रियकराला बोलावून दोघांची समजूत काढली. त्यानंतर त्या मुलीला तिच्या प्रियकरासोबत पाठविण्यात आले आहे अशी माहिती भायखळा रेल्वे स्थानकांचे उप स्टेशन व्यवस्थापक प्रथमेश सावंत यांनी सकाळाला दिली आहेत.

माझं त्या मुलावर अनेक वर्षापासून प्रेम होती मी त्याला सांगितले की आपण दोघे लग्न करू, पण त्याने नकार दिल्याने भायखळा स्थानकावर आम्हा दोघांमध्ये भांडण झाले, त्यामुळे मी आत्महत्या प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी आणि रेल्वे अधिकार्‍यांनी मला समजून माझ्या प्रियकरांचे आणि आमच्या दोघातला वाद सोडवून आम्हाला एकत्र आणले आहे. त्यासाठी मी रेल्वेचे आभार माणतोय.

- मुलगी (आत्महत्यांचा प्रयत्न करणारी)

आरपीएफ, मोटरमन आणि स्टेशन मास्तरच्या प्रयत्नामुळे तरुणीचे प्राण वाचले आहे.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे-

लोकल प्रवाशांचा काय दोष...?

कौटुंबिक वाद आणि नैराश्यामधून अनेक जण आत्महत्यासाठी रेल्वेकडे धाव घेतात. या घटनामुळे लोकल वाहतुकीला मोठा फटका बसतोय. या घटनेला आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसाची गस्त असते. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या नागरिकाचे प्राण वाचवले जातात. गेल्या काही वर्षांपासून मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकावर आज सर्रास प्रेमींयुगलांचे भांडणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर अनेक मुली स्थानकांवर रडताना सुद्धा दिसून येतात. त्यामुळे रेल्वेने या प्रेमीयुगलांचा हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यासाठी रेल्वे आणि राज्य सरकार मिळून काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सकाळला दिली आहे.

Web Title: Suicide After Avoiding Love Affair Derails

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..