पायल यांचा छळ झाला!

Payal-Tadvi
Payal-Tadvi

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक समितीने मंगळवारी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे अहवाल सादर केला. पायल यांचा छळ झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणातील संशयितांनी त्यांचा जातिवाचक उल्लेख केल्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे या अहवालात नमूद आहे.

या समितीत 21 सदस्य होते. त्यापैकी 16 सदस्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणाची पुन्हा फेरतपासणी होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पाचसदस्यीय समितीही स्थापन केल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. पायल यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या प्रकरणातील संशयित असलेल्या तिन्ही डॉक्‍टरांनी त्यांचा वर्षभर छळ केला. त्यांनी अर्वाच्य भाषाही वापरली, असे चौकशीत उघड झाले आहे. प्रथमदर्शनी पायल यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य दिसत आहे.

संशयितांनी आपली बाजू मांडली असती, तर नेमका निष्कर्ष काढता आला असता, अशी माहिती समितीतील काही सदस्यांनी दिली. दरम्यान, हा अहवाल गोपनीय असल्याने त्याबाबत माहिती देता येणार नाही, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com