सुनील गावस्कर उचलणार 34 बालकांच्या हृदयशस्त्रकियेचा संपूर्ण खर्च

gawaskar
gawaskar

खारघर : मुलाच्या हृदय संबधित आजारावर श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात मोफत शस्त्रकीया करून नवीन जीवदान मिळत असल्यामुळे देशातील विविध क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या क्रीडापटूनी या सामाजिक उपक्रमात  सहभागी व्हावे असे आवाहन क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी खारघर येथे केले. यावेळी श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर रुग्णालयाचे संचालक डॉ. श्रीनिवास, डॉ.विल्सन आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

खारघर सेक्टर 38 मध्ये  सत्यसाई हेल्थ आणि एज्युकेशन  ट्रस्टच्या वतीने  श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर रुग्णालय सुरु करण्यात असून आज या रुग्णालयास गावस्कर यांनी भेट दिली असता.यावेळी त्यांनी श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर रुग्णालयात 34 बालकाच्या हृदय शस्त्रकीयेसाठी लागणारा  संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली.रुग्णालयात  हृदया संबंधीच्या आजार असलेल्या बालकांचा मोफत उपचार केला जात आहे. शस्त्रकीयासाठी लागणाऱ्या  अत्याधुनिक मशीन यंत्रनेच्या मदतीसाठी विविध क्षेत्रातील युवा खेळाडूंनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन गावस्कर यांनी केले. तर यावेळी रुग्णालयाचे संचालक डॉ श्रीनिवास म्हणाले. जन्म घेणार्‍या 100 नवजात शिशुंपैकी एक बालक हृदयविकाराने ग्रासलेले असते.याचा अभ्यास करून ट्रस्टने लहान मुलाच्या हृदय संबधित आजारावर काम करण्याचा संकल्प केला. देशात ट्रस्टच्या  श्री सत्यसाई संजीवनी असलेल्या रुग्णालयात  गेल्या आठ वर्षात दहा हजार बालकांच्या मोफत  शस्त्रकीया करण्यात आल्या आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील लहान मुलांच्या हृदय संबधित आजारावर होणाऱ्या खर्च  देण्याची  देण्याचा करार केला असल्याचे सांगितले. 

माझा मुलगा अनुराग केवट आजारी सहा वर्षाचा असताना डॉक्टरांनी केलेल्या तपासणीच्या वेळी हृदयात छिद्र असल्याचे तपासणीत उघड झाल्यावर रायपुर येथील श्री  सत्यसाई संजीवनी रुग्णालयात मोफत उपचार करून सहा महिने झाले.त्यांना आज तपासणीसाठी घेवून आलो आहे.
- भरत केवट, छत्तीसगड  मुलांचे वडील आले.

माझा मुलगा आठ महिन्याचा आहे.मागील महिन्यात त्याला निमोनिया झाला होता. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता हृदयाला छिद्र असल्याचे समजले.आम्ही बेंगलोरला मुलांना घेवून जाण्याचा तयारीत असताना खारघर मध्ये मोफत उपचार होत असल्याची माहिती मिळताच आज सकाळी मुलांना घेवून आले.
- मीरा वैभव गडकरी,सांगली.मुलांची आई 

येथे संपर्क साधा- या रुग्णालयात जन्मापासून ते अठरा वर्षे वयोगट असलेल्या बालकावर या ठिकाणी उपचार केला जाणार आहे.रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मुलांचे अथवा पालकांचे आधार कार्ड मात्र शक्तीचे करण्यात आले आहे. रुग्णालयाचा पत्ता  श्री सत्य साई संजीवन हाॅस्पिटल, प्लाॅट क्र. 2 - ए , सेक्टर - 38  खारघर  असे असून   दुरध्वनीवर 02220870211 वर  संपर्क साधू शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com