थलायवा रजनीकांत पोहोचले मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट |Superstar Thalaiva Rajnikanth reaches in Mumbai Matoshree Uddhav Thackeray Shivsena Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray and Rajnikant
थलायवा रजनीकांत पोहोचले मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट

थलायवा रजनीकांत पोहोचले मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट

सुपरस्टार रजनीकांत सध्या मुंबईमध्ये आहेत. काल वानखेडे स्टेडिअममध्ये बसून मॅच पाहिल्यानंतर आता रजनीकांत मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आहे.

सुपरस्टार थलायवा अभिनेता रजनीकांत उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले आहेत. ही कोणतीही राजकीय भेट नाही. तर रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत, त्यामुळे ते मातोश्रीवर आले आहेत. रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी कौटुंबिक नातेसंबंध आहेत. त्यामुळे ही भेट होत आहे.

सुपरस्टार रजनीकांत मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मॅच पाहायला आले होते. बीसीसीआयकडून त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचं स्वागतही केलं.

अमोल काळे यांच्या मते, रजनीकांत यांच्या उपस्थितीमुळे भारतीय खेळाडूंचं मनोबल वाढेल. कारण संघामधले अनेक खेळाडू त्यांचे चाहते आहेत. तसंच प्रेक्षकांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण होईल.