उपकरप्राप्त इमारतीची म्हाडाकडून पाहणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

मुंबई - नायगाव दादरमधील 95 वर्षे जुन्या अहमद सेलर इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा सर्व सहकार्य करील, असे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. त्यांनी नुकतीच इमारतींची पाहणी करून रहिवाशांना मार्गदर्शनही केले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

घोसाळकर यांनी अहमद सेलर एक ते आठ क्रमांकांच्या उपकरप्राप्त इमारतींची पाहणी केली आणि रहिवाशांच्या समस्या जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले. "अ' वर्गात मोडणाऱ्या उपकरप्राप्त इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्या मोडकळीस आल्या आहेत. इमारतींमध्ये 338 कुटुंबे राहत असून 42 व्यापारी गाळे आहेत. इमारतींमधील रहिवाशांनी केलेल्या विनंतीवरून घोसाळकर यांनी पाहणी केली. त्यांनी रहिवाशांच्या अडचणी-समस्या जाणून घेत इमारतींच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांना मार्गदर्शन केले. घोसाळकर म्हणाले, की तीन ते चार मजले असलेल्या आठ इमारतींची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत 2013 पासून दोन ते पाच टप्प्यांत दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, इमारतीची दुरुस्ती मर्यादेपलीकडे गेली असून त्यांची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. रहिवाशांचे त्याबाबत एकमत असल्यास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. 

Web Title: Supervisor of Cessed Building by MHADA

टॅग्स