विविध समाजांचा मंदा म्हात्रे यांना पाठिंबा

विविध समाजांचा मंदा म्हात्रे यांना पाठिंबा
विविध समाजांचा मंदा म्हात्रे यांना पाठिंबा

नवी मुंबई : भाजप-शिवसेना महायुतीच्या बेलापूर मतदारसंघातील उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. समाजाच्याप्रती भान असल्यामुळे म्हात्रे यांना विविध समाजातील रहिवाशांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. नवी मुंबईतील महाराष्ट्र लहुजी समाज, जाट समाज आणि खरसई समाज, कोकण विभागातील रहिवाशांनी म्हात्रे यांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा जाहीर केला. 

विधान परिषद सदस्य आणि विधानसभा सदस्य अशी गेली दहा वर्षे अवितरपणे समाजकारण केल्यामुळे मंदा म्हात्रे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या आठवड्यात म्हात्रे मोटरसायकल रॅली यशस्वी ठरल्यानंतर आता म्हात्रेंनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला. बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा व वाशी विभागात म्हात्रेंनी अनेक रहिवाशी सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांची भेट घेतली. इतर सामाजांसोबत नवी मुंबईतील मूळच्या मुस्लिम समाजानेही म्हात्रे यांना समर्थन दिले. शहाबाज गावात म्हात्रेंचे मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी स्वागत केले. तसेच या निवडणुकीत म्हात्रेंच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचे आश्‍वासन ग्रामस्थांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com