esakal | हायकोर्टातील चार न्याय अधिकाऱ्यांच्या नावाची न्यायमूर्ती पदासाठी शिफारस | Mumbai high court
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai High Court

हायकोर्टातील चार न्याय अधिकाऱ्यांच्या नावाची न्यायमूर्ती पदासाठी शिफारस

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कोलेजिएम मंडळाने मुंबई उच्च न्यायालयातील (Mumbai high court) चार न्याय अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस न्यायमूर्ती पदासाठी (Judge post) केली आहे. कोलेजिएम मंडळाने मुंबईसह गुजरात, ओरिसा आणि पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयामध्ये नियुक्ती करण्यासाठी सोळा न्याय अधिकारी आणि वकिलांची (lawyers recommendation) शिफारस केली आहे. यामध्ये सहा न्याय अधिकारी आणि दहा वकिलांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्याय अधिकारी ए एल पानसरे, एस सी मोरे, यू एस जोशी-फाळके आणि बी पी देशप्रेम यांचा समावेश यामध्ये आहे.

हेही वाचा: BMC: भेंडी बाजाराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी २४ भुखंडाचे हस्तांतर

ओरिसा उच्च न्यायालयासाठी दोन वकील आणि दोन अधिकाऱ्यांची शिफारस आहे तर गुजरातसाठी सात वकिलांची शिफारस करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयासाठी एड संदिप मौडगील यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर गुरुवारी यासंबंधी पत्रक जारी करण्यात आले आहे.

loading image
go to top