#AareyForest आरेच्या वृक्षतोडीवर सर्वोच्च न्यायालय उद्या घेणार सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

आरे वसाहतीमध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरु झालेल्या वृक्षतोड आणि आंदोलनाची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. याबाबत आता उद्या (सोमवार) सकाळी सुनावणी घेण्याची नोटीस न्यायालयाने दिली आहे.

मुंबई : आरे वसाहतीमध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरु झालेल्या वृक्षतोड आणि आंदोलनाची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. याबाबत आता उद्या (सोमवार) सकाळी सुनावणी घेण्याची नोटीस न्यायालयाने दिली आहे.

मेट्रो प्रशासन आणि राज्य सरकारने ज्या पद्धतीने आरेतील झाडाची कत्तल सुरु केली. त्या बाबतीत आंदोलक रिषभ रंजन यांनी न्यायालयाला पत्र लिहिले होते. प्रशासनाने आतापर्यंत दोन हजारहून अधिक झाडे कापली आहेत. तर पन्नासहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. तर काहींना अटकही केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल आता न्यायालयाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आता आरे सुनावणीसाठी विशेष खंडपीठाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Image may contain: text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court will hearing on Aarey Forest Issue