चौपाटीवर सुप्रिया सुळेंचा कोरोना योद्धांसोबत सेल्फी, व्यक्त केली कृतज्ञता

पूजा विचारे
Sunday, 4 October 2020

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एक सेल्फी सध्या व्हायरल होत आहे. मुंबईतल्या चौपाटीवर तैनात असलेल्या पोलिसांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. 

मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पोलिसही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपली भूमिका बजावत असताना अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली. यात १०० हून अधिक पोलिसांचा मृत्यूही झाला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एक सेल्फी सध्या व्हायरल होत आहे. मुंबईतल्या चौपाटीवर तैनात असलेल्या पोलिसांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. 

संध्याकाळी चौपाटीच्या दिशेनं जात असताना सुप्रिया सुळे यांनी गाडी थांबवली आणि तिथे तैनात असलेल्या पोलिसांची भेट घेतली आणि या कोरोना योद्धांबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. 

हा फोटो ट्विट करत सुळेंनी म्हटलं की, कोरोनासारख्या कठिण परिस्थितीत पोलिस काम करताहेत. त्याबद्दल त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यापलीकडे आपल्याकडे शब्दच नाहीत. 

चौपाटीवर तैनात असलेल्या सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत सुप्रिया सुळे यांनी एक सेल्फी काढला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच तुम्ही आमची काळजी घेत आहात म्हणूनच आम्ही सुरक्षित असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. 

मुंबईतील रूग्णवाढीचा दर 1.09 वर

मुंबईत शनिवारी 2,402 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,12,336 झाली आहे. रूग्णवाढीचा दर वाढून 1.09 टक्के इतका गेला आहे. मुंबईत शनिवारी 46 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,057 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 1,634 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 82 टक्के इतका झाला आहे.

काल 1,634 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,73,670 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 64 दिवसांवर गेला आहे.   2 ऑक्टोबर पर्यंत एकूण 11,57,039  कोविड चाचण्या करण्यात आल्या.   26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.06 वरून वाढून 1.09 वर गेला आहे.

Supriya sule cilck Selfie in girgaon chaupati with mumbai police Corona Warrior


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya sule cilck Selfie in girgaon chaupati with mumbai police Corona Warrior