"महाराष्ट्र देशात एक नंबरला जाईल" - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

महाविकास आघाडीच्या वतीने  महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या वतीने प्रत्येकी दोन  नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये कॉंग्रेसचे बाळासाहेब थोराथ आणि डॉक्टर नितीन राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या गोटातून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. 

शपथविधी सोहळा संपल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्राच्या विकासाची ही नवी दिशा आहे. उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या शब्दात सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात. 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोराथ, डॉक्टर नितीन राऊत, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीये. याचबरोबर, महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांना सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्र देशात एक नंबरला जाईल याची खात्री मला आहे. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.   

supriya sule congratulate uddhav thackeray and all ministers

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya sule congratulate cm uddhav thackeray and all ministers