सुप्रिया सुळे 'वर्षा'वर; मुख्यमंत्र्यांशी आरेसंदर्भात चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मेट्रोचे कारशेड आरेमध्ये उभे करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार आहे, तसेच पर्यावरणाची हानी होणार आहे. या वृक्षतोडीला सर्वच क्षेत्रांतून विरोध सुरू आहे. म्हणूनच खासदार सुळे यांनी आज ही वृक्षतोड होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. 

मुंबई : आरे मधील वृक्षतोडीला सर्वच स्तरांतून विरोध होत असताना आज (ता. 20) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही 'वर्षा'वर जाऊन यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुळे यांनी त्यांना निवेदन दिले.

यांना हाकलायला वेळ लागणार नाही’; शरद पवार आक्रमक

मेट्रोचे कारशेड आरेमध्ये उभे करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार आहे, तसेच पर्यावरणाची हानी होणार आहे. या वृक्षतोडीला सर्वच क्षेत्रांतून विरोध सुरू आहे. म्हणूनच खासदार सुळे यांनी आज ही वृक्षतोड होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. 

एमपीएससी राज्यसेवा परिक्षा 2017मध्ये गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीमध्ये राज्यसरकारने घोळ घातला. काही विद्यार्थ्यांना यामुळे गुणवत्ता मिळवूनही दुय्यम पदे मिळत आहेत. काही मुलींना तर या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. आजच्या भेटीत पीएसआयच्या नियुक्तीबद्दलही निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule meets CM Devendra Fadnavis for Aarey carshade