'माँसाहेब अन् बाळासाहेब, आज तुमची खूप आठवण येतेय'; सुप्रिया सुळेंची भावनिक साद

टीम ईसकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री होणार यामुळे शिवसैनिकांसह राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्तेही खूश आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही भावनिक ट्विट करत बाळासाहेब व माँसाहेबांची आठवण काढली.

मुंबई : आज महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. तब्बल 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री आज शपथ घेईल. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री होणार यामुळे शिवसैनिकांसह राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्तेही खूश आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही भावनिक ट्विट करत बाळासाहेब व माँसाहेबांची आठवण काढली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड कर

आज संध्याकाळी साडेसहा वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. यानिमित्ताने सुप्रिया सुळे यांनी सकाळी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत, ट्विट करत बाळासाहेबांची व माँसाहेबांची आठवण काढली आहे. सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल.' असे भावनिक ट्विट करत सुप्रिया म्हणतात की बाळासाहेब व माँसाहेब आज हा सोहळा बघायला तुम्ही हवे होतात... त्यांचे हे भावनिक ट्विट सगळीकडे व्हायरल होत आहे. 

राज्यात आजपासून उद्धव सरकार  

मागील महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर तोडगा निघाला आणि या नाट्यमय घाडमोडीत आता काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकासआघाडी सत्ता स्थापन करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule tweeted about about Balasaheb and Masaheb Thackeray