सुप्रिया सुळे यांच्या घरी आला नवा 'पाहुणा'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मे 2019

राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यावर सर्वच नेते निवांत झालेले दिसत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे याही मतदान झाल्यावर प्रचारातून निवांत झाल्या असून सध्या त्या नातेवाईक आणि जवळच्या लोकांना भेटण्यासाठी वेळ देत असतानाचा त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. या नवीन पाहुण्याचे नाव लुका सुळे असे ठेवण्यात आले आहे.

मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यावर सर्वच नेते निवांत झालेले दिसत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे याही मतदान झाल्यावर प्रचारातून निवांत झाल्या असून सध्या त्या नातेवाईक आणि जवळच्या लोकांना भेटण्यासाठी वेळ देत असतानाचा त्यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. या नवीन पाहुण्याचे नाव लुका सुळे असे ठेवण्यात आले आहे.

लुका सुळे हा दुसरा कोणी नसून हा लाह्सा ओप्सा जातीचा कुत्रा आहे. त्याचे मूळ तिबेट देशात आहे. या कुत्र्याचे वजन साधारणत: 7 ते 8 किलो असते. या जातीच्या कुत्र्यांची वयोमर्यादा 12 ते 14 वर्षे आहे. हा कुत्रा सुप्रिया सुळे यांना त्यांचे मित्र संतोष यांनी भेट दिला असून, ही माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरून दिली आहे.

Supriya_Sule

दरम्यान, 23 मेला लोकसभेचा निकाल असून सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यांना भाजपच्या कांचन कूल यांनी तगडे आव्हान दिले असून, बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागेल याबाबत वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule Welcomes new Guest in her family