विश्वासघात करणाऱ्यांसोबत लढणाऱ्या शरद पवारांचा मला अभिमान - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

महाराष्ट्रातील सत्ता बाजारानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून भावनिक स्टेटस अपडेट केले जातायत. यामध्ये मुख्यत्त्वे राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याशी संबंधित स्टेटस किंवा फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आलेत.

सुप्रिया सुळेंनी आपलं व्हॉटस ऍप स्टेटसमध्ये संजय राऊत,  आदित्य ठाकरे त्याचबरोबर रोहित पवारांसह आपला फोटो स्टेट्सला ठेवला शिवाय संजय राऊत यांचा स्टार असा उल्लेख केला. यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडून आणखी एक व्हॉटसऍप स्टेटस ठेवण्यात आलंय 

He may win, he may lose, but Sharad Pawar is fighting like real Maratha warrior, against  every odd, be it Modi-Shah's brut power, trators within his family or his own age health condition. Haven't heard of this level of determination.  

- proud worker and daughter under his leadership.. blessed..

Image may contain: text

या  WhatsApp स्टेटसच्या माध्यमातून सुप्रिया सुळे  म्हणतायत,

ते जिंकतील किंवा हरतील, मात्र शरद पवार हे एका मराठा योध्याप्रमाणे प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरे जातायत. मग त्यामध्ये मोदी- शाह यांची क्रूर शक्ती असो, त्यांच्या स्वतःच्या घरातील विश्वासघात करणारा असो किंवा त्यांची स्वतःची तब्येत अओ. मी या लेव्हल चा दृढनिश्चय आधी पहिला नाही. मी शरद पवारांच्या नेतृत्वात एक कार्यकर्ता आणि मुलगी म्हणून मला याचा अभिमान आहे.  

संध्याकाळी पावणे सहा वाजता सुप्रिया सुळे यांनी हे स्टेटस अपडेट केलंय.  

Webtitle : supriya sules watasapp status on sharad pawar and about his leadership

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya sules watasapp status on sharad pawar and about his leadership