सुरेश लाड यांच्या प्रचारफेरीला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

 जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली.

कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली.
धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे महावीर पेठेत पोहोचली. तेथील व्यापाऱ्यांनी रॅलीचे स्वगात करत काही व्यापारी रॅलीत सामील झाले. त्यानंतर रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आली. 

तेथे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे निघाली. या वेळी ‘बिहार नको, महाराष्ट्र पाहिजे आम्हाला शांतता, सुरक्षितता पाहिजे त्यासाठी सुरेश लाडच आमदार झाले पाहिजे,’ अशा घोषणा रॅलीत सामील झालेल्या व्यापारी वर्गाने दिल्या.

या रॅलीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद लाड, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शहर अध्यक्ष नंदू लाड, एसआरपीचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, काँग्रेस तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे, तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, शहराध्यक्ष इरफान अत्तार, माजी शहराध्यक्ष विजय हरिश्‍चंद्र, व्यापारी वर्गाचे रणजित जैन, संतोष थोरवे, संजय सुर्वे, संदीप पाटील, अर्चना हगवणे, पूजा सुर्वे, मधुरा चंदन-पाटील, युसूफ खान, दिनेश रावळ, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष कमल विषे, नगरसेविका ज्योती मेंगाळ, कोयल कन्हेरीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suresh Lad prachar feri news