मुंबईतील 74 टक्के नागरिकांचे सर्वेक्षण, महापालिका आयुक्तांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

मुंबईची लोकसंख्या 2016 च्या अंदाजानुसार एक कोटी 26 लाख आहे. त्यापैकी 74 टक्के नागरिकांपर्यंत महापालिका पोहोचली आहे.

मुंबई : महापालिकेने आतापर्यंत मुंबईतील 94 लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले असल्याचा दावा आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केला आहे. शून्य कोरोना शीघ्र कृती उपक्रमाला सोमवारी सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

नक्की वाचा : तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

मुंबईची लोकसंख्या 2016 च्या अंदाजानुसार एक कोटी 26 लाख आहे. त्यापैकी 74 टक्के नागरिकांपर्यंत महापालिका पोहोचली आहे. एकूण पाच लाख ज्येष्ठ नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. या व्यापक प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 36 दिवसांपर्यंत आला आहे, असे महापालिका आयुक्त चहल यांनी सांगितले.

BIG NEWS  - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

कोव्हिडबाधित रुग्णांसाठी मे महिन्यात 3700 खाटा उपलब्ध होत्या, ही संख्या आता 12 हजारांवर गेली आहे. जूनच्या अखेरपर्यंत 15 हजार आणि जुलैच्या अखेरपर्यंत 20 हजार खाटा उपलब्ध असतील, असेही आयुक्तांनी नमूद केले. मे महिन्यात 100 रुग्णवाहिका सज्ज होत्या, सध्या 700 रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

50 फिरते दवाखाने
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती होती. परंतु, 3 ते 22 जून या 19 दिवसांत बाधितांची संख्या नियंत्रणात राहिली आहे. दरम्यान, सहा विभागांत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या भागांमध्ये बाधितांचा शोध घेऊन जागेवरच तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. महापालिकेने मालाड, बोरिवली, कांदिवली, दहिसर, भांडूप, मुलुंड या विभागांसाठी 50 फिरत्या दवाखान्यांची व्यवस्था केली आहे.

a survey of 74 per cent citizens in Mumbai, claims the Municipal Commissioner


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a survey of 74 per cent citizens in Mumbai, claims the Municipal Commissioner