उल्हासनगरला मेट्रोच्या मार्गात आणण्यासाठी होणार सर्वेक्षण 

 दिनेश गोगी
रविवार, 3 मार्च 2019

उल्हासनगर : कल्याण-अंबरनाथ-बदलापूर शहरात मेट्रो धावणार आहे. मात्र मध्यभागी असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेला मेट्रोच्या प्रकल्पातून वगळण्यात आल्याबाबत महापौर पंचम कलानी, टीम ओमी कलानी गटाचे नगरसेवक राजेश वधारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. उल्हासनगरला मेट्रोच्या मार्गात आणण्यासाठी सर्व्हेक्षण केले जाणार असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. यासोबतच  कल्याण - कर्जत राज्यमार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे असे आदेश  फडणवीस यांनी एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 
मेट्रोचा एक मार्ग ठाणे-भिवंडी-कल्याण तर दुसरा मार्ग नवी मुंबई-शीळफाटा-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर असा आहे.मात्र मध्यभागी असणाऱ्या उल्हासनगरला मेट्रोपासून वंचित ठेवण्यात आल्याची खंत महापौर पंचम कलानी, नगरसेवक राजेश वधारिया यांनी व्यक्त केली. त्यावर फडणवीस यांनी लवकरच उल्हासनगरला मेट्रोच्या मार्गात आणण्यासाठी सर्व्हेक्षण केले जाणार ,असे सकारात्मक आश्वासन दिले.

कल्याण-कर्जत राज्य महामार्गाचे काम गेल्या 3 वर्षांपासून रखडले आहे. यामुळे उल्हासनगर शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते , रस्त्याच्या अर्धवट कामामुळे ठिकठिकाणी खड्डे झालेले आहेत, काही दिवसांपूर्वी रस्त्यातील खड्ड्यामुळे एका समाजसेवकाला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर होणे गरजेचे आहे. ,अशी विनंती पंचम कलानी, राजेश वधारिया यांनी केल्यावर राज्य महामार्गाच्या कामास तातडीने सुरवात करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी  एमएमआरडीए आयुक्तांना दिले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey to bring Ulhasnagar to the metro route