बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण ग्रामस्थांनी रोखले; जमिनी देण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या सर्वेक्षणाला नवसारीजवळील अमदपूर गावातील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. ग्रामस्थांनी एकजुटीने येथील सर्वेक्षणच रोखत भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परतवून लावले. 

बुलेट ट्रेन प्रकल्पाला महराष्ट्रात होणारा विरोध पाहता गुजरातमधील शेतकऱ्यांनीही आता विरोध करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी थेट जपानच्या जेआयसीए कंपनीला पत्र लिहून भूसंपादनाची प्रक्रिया कंपनीच्या दिशानिर्देशनानुसार होत नसल्याचे कळवले होते. केंद्र सरकारच्या 2013 सालच्या भूमी अधिग्रहण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर जपानच्या कंपनीचे अधिकारी येथील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी या ठिकाणी आले. या वेळी जिका कंपनीचे प्रमुख कात्सुवो माटसुमोरो तर आणि शेतकऱ्यांच्या एकता परिषदेच्या सदस्यांनी या वेळी चर्चा केली; मात्र चर्चेतून समाधान न झाल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचे सांगत कुठल्याही परिस्थितीत यासाठी जमिनी न देण्याचा पवित्रा घेतला. आदिवासी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी या वेळी एकत्र येत अधिकाऱ्यांना सर्वेक्षणही करू दिले नाही. 

Web Title: survey of bullet train stopped by villagers at palghar