आदित्यसाठी शिवसेनेनं काँग्रेसवाल्यांना पगारावर ठेवलंय; काँग्रेसच्या आरोपानंतर भाजप नेता संतापला

पूजा विचारे
Tuesday, 1 September 2020

माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले असून त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मुंबईः  अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय तपास करत आहे.  सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. त्यात राजकीय प्रतिनिधींनी उडी घेतल्यानं या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात चौकशीच्या कक्षेत असलेल्या संदिपसिंह या तरुणाची आणि भाजपच्या नेत्यांच्या संबधांचा तपास करण्याची मागणी कॉंग्रेसने केली. यावर आता माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले असून त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 

निलेश राणे यांनी ट्विट करुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या केसमध्ये आदित्यला वाचवण्यासाठी काही काँग्रेसवाल्यांना शिवसेनेने पगारावर उचलले. रोज उठून काँग्रेसवाले संदीप सिंह आणि भाजपचं कनेक्शन शोधतायत. मीडियावाले पण दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूतचे खरे आरोपी शोधायचं विसरून फालतू प्रकरणात गुंतले. अजून ही राज्य सरकार संशयास्पद पाठलाग करताना दिसतंय, असं निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. निलेश राणे हे या प्रकरणात सातत्यानं आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. 

 

काँग्रेसचा आरोप

सुशांतसिंग प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील घनिष्ट संबंध आता उघड होताहेत. या संदिप सिंहनं भाजप कार्यालयाशी तब्बल 53 वेळा फोन केले असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

हेही वाचाः  शरद पवार सहकुटुंबिय 'वर्षा'वर बाप्पाच्या दर्शनाला, सुप्रिया सुळेंकडून 'सीकेपी मूव्हमेंट' शेअर

ती खरी असल्यास भाजप कार्यालयातील ‘तो’ बॉस कोण आणि भाजपची संदीप सिंहशी एवढी जवळीक कशी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणी सचिन सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे.या प्रकरणी कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रीया दिली. देशमुख यांनी सोमवारी कॉंग्रेस शिष्ठमंडळाची मागणीसंदर्भात चौकशी करण्याची विनंती सीबीआयला केली असल्याची माहिती दिली आहे. 

Sushant singh case bjp nilesh rane attack congress shivsena aditya thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant singh case bjp nilesh rane attack congress shivsena aditya thackeray