बिहारहून आले तपासासाठी... आणि मुंबईत झाले क्वांरटाईन

पूजा विचारे
Monday, 3 August 2020

बॉलिवूड अॅक्टर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशीसाठी बिहारहून आलेले पटणाचे एसपी विनय तिवारी यांना मुंबईत क्वांरटाईन केलं असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईः बॉलिवूड अॅक्टर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशीसाठी बिहारहून आलेले पटणाचे एसपी विनय तिवारी यांना मुंबईत क्वांरटाईन केलं असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पालिकेनं याबाबतची माहिती दिली आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बिहारहून आलेल्या अधिकाऱ्यांना क्वांरटाईन केलं आहे. विनय तिवारी रविवारी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले होते. 

बिहार पोलिस असोसिएशनच्या अध्यक्षांनी आरोप केला आहे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झालेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांनी IPS हॉस्टेलमध्ये थांबण्यासाठी जागाच देण्यात आली नव्हती. जेव्हा त्यांनी स्वतःच्या राहण्याची व्यवस्था केली तेव्हा त्यांना त्यांच्या जागेबद्दल विचारण्यात आलं. जसं त्यांना तिवारी यांच्या राहण्याचा पत्ता मिळाला बीएमसीनं त्यांना कोरोनाच्या भीतिमुळे तात्काळ क्वांरटाईन केलं. बीएमसीनं एसपी विनय तिवारी यांनी जबरदस्ती क्वांरटाईन केलं.

रिया चक्रवर्तीनं तपासात सहकार्य करावं 

मीडियाशी बोलताना बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की,  रिया चक्रवर्ती हिनं भावनिक व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर ती गेल्या तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता आहेत आणि तिचा फोनही लागत नाही आहे. चौकशीसाठी रियानं पुढे येऊन बिहार पोलिसांना सहकार्य करावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. असं नाही आहे की, ती समोर येताच आम्ही तिला फासावर चढवू. 

 सुशांतची पूर्वीचे मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसही चौकशी करणार आहेत. एका पोलिस अधिकाऱ्यानं रविवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पोलिसांची टीम राजपूतचा मित्र आणि क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर सिद्धार्थ पिठानीचीही चौकशी करेल. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर बिहार पोलिस या आत्महत्याचा स्वतंत्रपणे तपास करताहेत. 

Sushant Singh Rajput Case IPS officer Vinay Tiwari forcibly quarantined bmc


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput Case IPS officer Vinay Tiwari forcibly quarantined bmc