सुशांत सिंह राजपूत प्रकरण Update: शौविक-मिरांडाला चार दिवसांची NCB कोठडी, रियावर अटकेची टांगती तलवार

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 September 2020

याप्रकरणात रिया चक्रवर्तीला देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.  

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला ड्रग्ड रॅकेचं वेगळ वळण लागले आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून म्हणजेच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) यासंदर्भात मोठी कारवाई केली. शुक्रवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि ऐकेकाळी सुशांतचा मॅनेजर असलेल्या सॅम्युअल मिरांडाला अटक करण्यात आली होती. या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून चौकशीसाठी त्यांना कस्टडीत घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. याप्रकरणात रिया चक्रवर्तीला देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.  

-रियाचा भाऊ शौविक आणि मिरांडा यांना 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी 

-एनसीबीकडून रियाविरोधात गुन्हा दाखल

- ड्रग्जसंदर्भातील चॅटमध्ये रियाचंही नाव आहे. याप्रकरणात रविवारी तिची चौकशी होऊ शकते. याप्रकरणात तिच्या अटकेचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे.

-सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिस सीबीआयला आवश्यक ती मदत करत आहेत, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. मात्र या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनसंदर्भातील प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले. 

-शोविक चक्रवर्ती याची बाजू मांडणारे वकील सतीश मानशिंदे यांनी एनसीबीने मागितलेल्या रिमांडला विरोध

-NCB कडून शोविक-मिरांडाला 7 दिवसांच्या कोठडीची मागणी  
 

-शौविक-सॅम्युअलची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर या दोघांना कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे

जैद विलात्रा आणि बासित परिहार यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. 
 

शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, जैद यांना वैद्यकीय चाचणीसाठी सायनच्या रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी त्यांची कोरोना चाचणीही होणार असल्याचे समजते. ​
 

आतापर्यंत याप्रकरणात काय काय झाले

-एनसीबीने अमली पदार्थ विक्रेता जैद विलात्रा याची कसून चौकशी केल्यानंतर बांद्रा येथील निवासस्थानावरुन  बासित परिहारला अटक करण्यात आली. त्याची चौकशी करत असताना याप्रकरणात शौविक आणि मिरांडा यांची नावे समोर आली. शुक्रवारी एनसीबने या दोघांच्या घरावर छापेमारी केली. यात त्यांना काही ठोस पुरावे हाती लागल्याचा दावा अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात आला आहे. एनसीबीने या दोघांच्या घरावर जवळपास तीन-चार तास शोधमोहिम केली होती.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput death case live updates ncb rhea chakraborty brother showik samuel miranda court cbi