14 जूनला सुशांतच्या घराबाहेर 'का' होत्या दोन रुग्णवाहिका, चालकानं केला खुलासा

पूजा विचारे | Sunday, 30 August 2020

सुशांतच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या घरी दोन रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. त्या रुग्णवाहिकेमधून त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. 

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या घरी दोन रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. त्या रुग्णवाहिकेमधून त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. 

यानंतर रुग्णवाहिकांचे समन्वयक विशाल यांनी सांगितले की, लोकं आम्हाला त्रास देत असून जीवे मारण्याची धमकीही देताहेत. त्यांनी पुढे म्हटलं की, आमच्यावर सुशांत सिंह राजपूत यांच्या हत्येचा देखील आरोप करण्यात येत आहे. 

विशाल पुढे सांगतात की,  आमच्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आम्हाला लोकं शिव्या घालत आहेत. हा एक राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. आम्ही आतापर्यंत लोकांना मदत करत आलो आहोत. मात्र आता कोणालाही मदत करताना भीती वाटते. 

हेही वाचाः  भिवंडीत मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

विशालनं असे सांगितले की,  सुशांतचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णवाहिका घेऊन त्यांची टीम त्यांच्या घरी गेली होती आणि सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्याचा दावा एका मीडियाच्या मुलाखतीत एका व्यक्तीनं केला होता. ज्याला मी ओळखत नाही. जो व्यक्ती माझ्या टीममधला देखील नाही आहे. 

पहिल्या रुग्णवाहिकेचा चालक साहिल यांनं सुशांतच्या घरी दोन रुग्णवाहिका का होत्या याचं उत्तर दिलं आहे. साहिल यांनी सांगितलं की, पहिल्या रुग्णवाहिकेचे ट्रॉली व्हील तुटले होते आणि म्हणून आम्हाला रुग्णवाहिका बदलावी लागली. जशी दुसरी दुसरी रुग्णवाहिका आली आणि मी पहिली रुग्णवाहिका घेऊन बाहेर पडलो.

अधिक वाचाः  सुशांतच्या बँक अकाऊंटमधल्या ७० कोटींचा असा झाला व्यवहार, वाचा सविस्तर

दुसर्‍या रुग्णवाहिकेचा चालक अक्षय म्हणाला, मला पोलिसांचा फोन आला आणि रुग्णवाहिका जिथे पार्क केलेली त्या ठिकाणी गेले. पहिल्या रुग्णवाहिकेचे स्ट्रेचर व्हील तुटले होते म्हणूनच दुसरी रुग्णवाहिका बोलविण्यात आली, अक्षयनं देखील हे सांगितलं.

अधिक वाचाः  काँग्रेसच्या आरोपानंतर संदीप सिंहची चौकशी होणार?, गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

अक्षयने पुढे सांगितले की, सुशांतचा मृतदेह आणण्यासाठी मी पायऱ्या चढून त्याच्या घरी गेला आणि तिथे त्याच्या रुममध्ये काही काळ थांबलो देखील होतो. जेव्हा मी खोलीत पोहोचलो होतो तेव्हा तिथे पोलिस हजर होते. अक्षय आणि त्याच्या साथीदारानं सुशांतचा मृतदेह बेडवरुन रीक्सिन कव्हरवर ठेवला. त्यानंतर सुशांतचा मृतदेह रुममधून रूग्णवाहिकेत नेण्यात आला.

Sushant Singh Rajput Two ambulances June 14 residence Driver reveals