सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण:NCBच्या कारवायांनंतर बॉलिवूड ड्रग्स वितरक अंडरग्राऊंड

अनिश पाटील | Friday, 11 September 2020

फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा आणि अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलिवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले आहेत.

मुंबईः  अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक(एनसीबी) पेज थ्री सेलिब्रिटींशी संबंधीत अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केल्यानंतर  ड्रग्स पुरवणा-या रॅकेटशी संबंधित इतरांच्या शोधात आहेत. फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा आणि अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलिवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले आहेत.

मुंबई पोलिसांनीही गेल्या दोन वर्षांत पश्चिम मुंबईत 70 हून अधिक कारवाया केल्या आहेत. त्यातील 30 कारवायांमध्ये ड्रग्सचा साठा पकडण्यात आला आहेत. मुंबईतील कारवाईत अटक करण्यात आलेल्या वितरकांचेही वांद्रे परिसरात जाळे होते. त्याची तार शौविकपर्यंत पोहोचली होते. जैद आणि बशीद या दोन संशयीतांकडून एनसीबी मुंबईतील ड्रग्स वर्तुळाबाबतची महत्त्वपूर्ण माहिती घेतली आहे. संशयित जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून त्याची चौकशी याप्रकरणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तो वांद्रे परिसरात सक्रिय होता.

जैदने  17 मार्च दिलेल्या ड्रग्स डिलेवरीचे तार सुशांत सिंह प्रकरणाशी जुळत आहेत. त्या माहितीच्या आधारे एनसीबीनं बशीद परिहार नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाला देखील ताब्यात घेतले. हा तोच बशीद आहे याच बशीदने या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीची ओळख जैदशी केल्याचे बोलले जात आहे.  

जैद हा बांद्राला राहत असून त्याचे पूर्ण नाव जैद विलात्रा आहे. तर एनसीबीच्या हाती एक व्हॉट्सअॅप चॅट लागले आहे. ज्यात या जैद आणि बशीदचे नाव आहे. याप्रकरणी आतापर्यंत रियासह 10 जणांना अटक झाली आहे. याशिवाय प्रकरणाचे तार आपल्याप्रर्यंत पोहोचू नये, यासाठी अनेक तस्कर सध्या अंडरग्राउंड झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सुशांत सिंह प्रकरणामुळे वातावरण गरम झाले आहे. त्यामुळे काही काळ पश्चिम मुंबईतील ड्रग्स वर्तुळातही शांतता पहायला मिळेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

---------------

(संपादनः पूजा विचारे) 

Sushant Singh suicide case Bollywood drug dealer underground after NCB action