
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पेजथ्री, बॉलीवूड सेलेब्रीटींना ड्रग्स पुरवणा-या रॅकेटचा माग घेणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधीत पथकाने(एनसीबी) मुंबई, गोवा येथे शोध मोहिम राबवली.
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः ड्रग्स पुरवणाऱ्या रॅकेटचा मागोवा घेण्यासाठी मुंबई - गोव्यात एनसीबीचे छापे
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पेजथ्री, बॉलीवूड सेलेब्रीटींना ड्रग्स पुरवणा-या रॅकेटचा माग घेणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधीत पथकाने(एनसीबी) मुंबई, गोवा येथे शोध मोहिम राबवली. याप्रकरणी कारवाईच्या भीतीने अनेक ड्रग्स वितरक अंडरग्राऊंड झाले आहेत.
शिवकेबल सेना ही संवैधानिक संस्था नाही; रिपब्लिक टीव्हीने केलेली याचिका निकाली
शहरातील पवई, अंधेरी परिसरात तर गोवा येथे एनसीबीने छापे टाकले आहेत. याचा अधिक तपास करण्यास एनसीबीने सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे, रियाने ड्रग्जसाठी ज्यांच्याशी संपर्क साधला होता, अशा सर्वाना चौकशीसाठी बोलवण्यात येत आहेत. येणा-या काही दिवसात एनसीबी ड्रग्ज तस्करा विरोधात जोरदार मोहिम सुरू करणार आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक(एनसीबी) पेज थ्री सेलिब्रीटींशी संबंधीत अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केल्यानंतर ड्रग्स पुरवणा-या रॅकेटशी संबंधीत इतरांच्या शोधात आहेत. फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा व अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलीवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले आहेत. त्यासाठी एनसीबीने रविवारी विशेष शोध मोहिम राबवली. याप्रकरणी काही बॉलीवूड सेलेब्रीटींची यादी एनसीबीने तयार केली आहे. त्यांना ड्रग्स पुरवणा-या वितरकांचा शोध सध्या एनसीबीकडून सुरू आहे. त्यासाठी मुंबई व गोव्यात ही शोध मोहिम राबवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री, शरद पवार आणि संजय राऊतांना धमकी देणाऱ्याला अटक; एटीएसची कारवाई
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात प्रकरणात तपास करणा-या एनसीबीने 18 जणांची यादी तयार केली आहे. या सर्वाना चौकशीचे समन्स पाठविण्यात येणार आहेत. त्यात काही सेलेब्रीटींसह पेज थ्रीमध्ये वावरणा-या व्यक्तीचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.
--------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Web Title: Sushant Singh Suicide Case Ncb Raids Mumbai Goa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..