सत्तास्थापनेचा पेच 'या' बैठकीत तरी सुटणार का ?

सत्तास्थापनेचा पेच 'या' बैठकीत तरी सुटणार का ?

दिल्लीतून सुशीलकुमार शिंदे आणि माणिकराव ठाकरे मुंबईत परतलेत. सुशीलकुमार शिंदे आणि माणिकराव ठाकरे यांनी मुंबई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला.  दरम्यान  सुशिक कुमार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, "आम्ही NCP सोबत आहोत असं म्हटलंय. जे काही करायचंय ते NCP सोबतच्या चर्चेनंतर स्पष्ट होणार आहे.  आधी वैचारिक मतभेद होते आता थोडा स्मूथनेस आलाय. राज्यपाल काहीही करू शकतात. राज त्याचं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरीही त्याचा मोठा फरक पडणार नाही. सत्तेत सरकार येण्यापासून ते नाकारू शकत नाहीत. राष्ट्रपती राजवट कधीही लिफ्ट होऊ शकते. शीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. 

कालची परिस्थिती सर्वांनी पहिलीच. आजच्या परिस्थिती महाराष्ट्रात कश्या प्रकारे सरकार स्थापन करू शकतो ही आमची भूमिका आहे. असं ही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. 

काय म्हणालेत माणिकराव ठाकरे : 

कालच दिल्लीत हायकमांड सोबत बैठक पार पडली. यानंतर सर्व कॉंग्रेस आमदारांसोबत देखील चर्चा झाली. राज्यातील नेत्यांसोबत चर्चा झाली. या बैठकीत आपण एकत्रित यायला हवं असा निर्णय झाल्याचं माणिकराव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं आहे.  मात्र कश्या पद्धतीने पुढे जाणार आहोत हे NCP सोबतच्या बैठकीनंतर ठरणार असल्याचंही ठाकरे म्हणालेत.  

आम्ही एकत्रित बसू, त्यात शिवसेना देखील सहभागी असेल हे देखील माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. सहयोग देण्यासंदर्भात चर्चा झालीये मात्र आता पुढे कश्या प्रकारे जाणार याबाबत आज चर्चा होणार आहे.

दरम्यान कॉंग्रेसचा मुख्यमंत्री याबाबत आम्ही मागणी करणार नाही, तसा आमचा विचार नाही. मात्र एकत्रित चर्चा करताना सर्व मुद्दे समोर येतील. आणि त्यानंतर पाच वर्ष सरकार टिकायचं असेल ही चर्चा व्हायला हवी असं मत माणिकराव ठाकरे  व्यक्त केलं.   

दरम्यान, आता NCP आणि कॉंग्रेसची बैठक झाल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होणार आहे.  

Webtitle : sushilkumar shinde and manikrao thackeray on meeting with NCP

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com