एसटीच्या रोजंदारी कामगारांचे निलंबन मागे

सोमवार, 25 जून 2018

अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एसटीच्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्याप्रमाणे अशा सर्व कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती देण्याबाबतचे आदेश महामंडळाने दिले आहेत. या निर्णयाचे मान्यता प्राप्त संघटनेने स्वागत करत पुन्हा नव्याने नियुक्ती का असा सवालही उपस्थीत केला आहे. 

मुंबई : अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एसटीच्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्याप्रमाणे अशा सर्व कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती देण्याबाबतचे आदेश महामंडळाने दिले आहेत. या निर्णयाचे मान्यता प्राप्त संघटनेने स्वागत करत पुन्हा नव्याने नियुक्ती का असा सवालही उपस्थीत केला आहे. 

रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरी देखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान होतांना प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय देखील झाल्याचा ठपका ठेवत महमंडळाने 1010 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती.

या निर्णयाबाबत महामंडळाच्या विरोधात कामगार संघटनांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या होत्या. कामगार संघटनांनी सेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याबाबत विनंती केली होती. याचाच सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहन मंत्र्यांनी निदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या आदेशाचे पालन करत अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्चित केले असून  यासंदर्भातील परिपत्रक आज (सोमवार ता. 25) रोजी जारी केला.  या सर्व कर्मचाऱ्यांना दि. 1 जुलै 2018 पासून नव्याने नियुक्ती दिली जाणार आहे.

आज सेवामुक्त केलेल्या कामगारांना सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचे स्वागतच आहे. पण या कामगारांना 1 जुलै पासून नव्याने नेमणूक दिली जाणार आहे हे योग्य नव्हे. त्यांना पुर्ववत लागलेल्या दिवसापासूनच सेवेत धरावे अशी संघटनेची मागणी आहे व त्यासाठी संघटना पाठपुरावा  करेल असे मत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष  संदिप शिंदे यांनी व्यक्त केले.

Web Title: The suspension of ST workers are back