'शाश्‍वत विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई - शहरांच्या शाश्‍वत विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो. यासाठीच भाजपने महापालिका निवडणुकांचा जाहीरनामा बनविण्यासाठी त्यात लोकसहभाग घेतला. आपले शहर आपला अजेंडा या संकल्पनेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आपल्या शहराबाबत जनतेच्या या अपेक्षा-आकांक्षांचे प्रतिबिंब भाजपच्या जाहीरनाम्यात दिसून येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

पार्लमेंट ते पालिका असे एकाच पक्षाचे सरकार असल्यास शाश्‍वत विकास करणे अधिक सोपे ठरेल. भाजप मुंबईसह राज्यातील सर्व शहरांचा शाश्‍वत विकास करेल अशी ग्वाही देतो, असेही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी आज फेसबुक, ट्‌विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला. जाहीरनाम्याबाबत जनतेच्या अपेक्षा जाणून घेतल्या. राज्यभरातून निवडक वीस जणांना जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलाविण्यात आले होते. त्यांच्याही प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. शहरांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर या सर्वांचाच वापर महापालिकेच्या धोरणात झाला पाहिजे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना महापालिकेचे प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागपूरला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. परळी केंद्रालाही नांदेडचे पाणी मिळते आहे. महापालिकांना उत्पन्नाचा हा स्त्रोत तयार झाल्याचे फडणवीस म्हणाले. 

पारदर्शकतेच्या मुद्‌द्‌यावर युती तुटली 
शिवसेनेसोबत कारभारातल्या पारदर्शकतेच्या मुद्‌द्‌यावरच युती तुटली. आमचा काही जागांचा हट्‌ट नव्हता. महापालिकांचा कारभार पारदर्शक झाला पाहिजे ही भूमिका होती. पारदर्शकतेच्या मुद्‌द्‌यावर कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

काय म्हणाले मुख्यमंत्री 
सार्वजनिक प्रवास व्यवस्था भक्‍कम करणार 
शाश्‍वत विकासासाठी प्रयत्न 
महिलांसाठी शौचालय बांधणे अनिवार्य करणार 
पुण्याला देशाची स्टार्ट अप राजधानी बनविणार 

Web Title: sustainable development