Corona : झपाट्याने रुग्ण संख्या वाढणाऱ्या 'या' तालुक्यात स्वॅब टेस्टिंग बुथ सुरु

swab test.
swab test.

अलिबाग : उरण तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या या तालुक्यात 56 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. बाधितांचा आकडा वाढतच असल्याने तात्काळ स्वॅब सॅम्पल तपासणी बुथ उरण येथे सुरू करण्यात आला आहे. अशाच प्रकारचे बुथ कर्जत येथेही सुरू केले आहे.

बुथद्वारे स्वॅब सॅम्पल घेताना कर्मचाऱ्यांना लागण होण्याची शक्यता कमी असते. उरण आणि कर्जत येथे स्वॅब सॅम्पल तपासणी बुथ सुरू करण्यात पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. अदिती तटकरे यांच्या सूचनेनुसार रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, रोहा यांच्यातर्फे पी. पी. बारदेस्कर यांनी दोन स्वॅब टेस्टिंग क्यूब बुधवारी (ता. 13) सुपूर्द केले. सध्या वाढत जाणाऱ्या संशयित बाधित रुग्णांची तपासणी जलद गतीने होण्यासाठी स्वॅब सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण विकसित केले आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव, महाड, रोहा, तळा, सुधागड आदी ठिकाणी हे बूथ आधीच कार्यान्वित केले आहेत. 

उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटल व कर्जत येथील उप जिल्हा रुग्णालय येथे हे बूथ बसविण्यात येत आहेत. याद्वारे पीपीई किटच्या खर्चाची बचत तर होईलच; पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणीही होऊ शकेल.

Swab testing booth started at Uran, Karjat, Checking will be fast

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com