स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण कमिटी मानधनापासून वंचित

Swachh Bharat Abhiyan Survey Committee deprives of honor funding
Swachh Bharat Abhiyan Survey Committee deprives of honor funding

उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीने दिलेल्या अहवालानुसार उल्हासनगर पालिकेने पॅनल 10, पॅनल 18 व पॅनल 19 तीन पॅनलचा निकाल घोषित करून पालिकेने त्यांना महासभेत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र कमिटीला त्यांच्या मानधना पासून वंचित असून त्यांचे प्रत्येकी 25 हजार रुपये लटकवून ठेवण्यात आलेले आहेत. फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे उल्हासनगरात असताना स्वच्छभारत सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते.

जो पॅनल या सर्वेक्षणात प्रथम येणार त्या पॅनलला पालिकेचे 50 आणि शासनाचे 30 असे 80 लाख, दुसऱ्या पॅनलला पालिकेचे 30 व शासनाचे 20 असे 50 लाख आणि तिसऱ्या पॅनलला पालिकेचे 20 व शासनाचे 10 असे 30 लाख रुपये विकास निधीच्या रूपात इनाम म्हणून दिले जाणार असे घोषित करण्यात आले होते.

या सर्वेक्षणासाठी रमेश नानकानी, नंदकुमार चव्हाण, ज्योती तायडे, डॉ.राजू उत्तमानी, राजू तेलकर, अॅड. निकम यांची समिती गठीत करण्यात आली होती. समितीने एका पॅनल मध्ये असलेल्या चार वॉर्ड याप्रमाणे 78 वॉर्ड पिंजून काढले. कुठे स्वछता आणि कुठे अस्वच्छता याची फोटोग्राफी टिपली, चित्रीकरण करून संपुर्ण उल्हासनगरातील केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे सोपवला होता. कमिटीने दिलेल्या अहवालानुसा मागच्या महिन्यात मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांनी सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला. त्यात राजेंद्र चौधरी, राजश्री चौधरी, शुभांगी बेहनवाल, पुष्पा बागूल या शिवसेना नगरसेवकांच्या पॅनल 10 ला पहिला, राजेश वानखडे(भाजपा), अंजली साळवे(काँग्रेस), प्रमोद टाले(पीआरपी) कविता बागूल (भारिप बहुजन महासंघ) यांच्या पॅनल 18 ला दुसरा आणि मीना सोंडे, विजय पाटील, किशोर वनवारी, मिनाक्षी पाटील यांच्या पॅनल 19 ने तिसरा क्रमांक देण्यात आला. आणि महासभेत त्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले.

मात्र सतत पाच महिने पदरमोड करून स्वच्छ भारत अभियानाचा सर्वेक्षण करणारे रमेश नानकानी, नंदकुमार चव्हाण, ज्योती तायडे, राजू तेलकर, डॉ.राजू उत्तमानी, अॅड.निकम यांना तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मानधनाच्या रूपात जाहिर केलेले केलेले 25 हजार रुपये अद्यापही मिळालेले नाहीत. निंबाळकर असते तर लागलीच मानधन मिळाले असते. पण त्यांची बदली झाल्याने मानधनाची फाईल या टेबलवरून त्या टेबलावर फिरत असल्याची खंत कमिटीतील काही सदस्य व्यक्त करत आहेत. याबाबत मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांच्याशी विचारणा केली असता, कमिटीचे मानधन प्रस्तावित असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com