स्वाधीन क्षत्रिय यांचा शपथविधी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी बुधवारी (ता. 1) राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ घेतली. सह्याद्री अतिथीगृहात सकाळी शपथविधी सोहळा झाला.

मुंबई - माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी बुधवारी (ता. 1) राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ घेतली. सह्याद्री अतिथीगृहात सकाळी शपथविधी सोहळा झाला.

राज्यपालांनी शपथविधीसाठी प्राधिकृत केलेले लोकायुक्त एम. एल. टहलियानी यांनी क्षत्रिय यांना आयुक्तपदाची शपथ दिली. मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी नेमणुकीची अधिसूचना आणि राज्यपालांनी लोकायुक्तांना प्राधिकृत केलेल्या पत्राचे वाचन केले. राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाचा कालावधी पाच वर्षांचा असेल. शपथविधी सोहळ्यास राज्य मुख्य माहिती आयुक्त डॉ. रत्नाकर गायकवाड, माजी मुख्य माहिती आयुक्त सुरेश जोशी यांच्यासह राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

Web Title: swadhin kshatriya swearing