व्यसनमुक्तीवर विद्यार्थिनींची शपथ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोलीकडून सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्‍तीची शपथ घेतली.

खोपोली (बातमीदार) : अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोलीकडून सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्‍तीची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाखेच्या सभासदांनी वसतिगृहाच्या संचालिका कांचन जाधव व व्यवस्थापक आशा जाधव यांच्याशी चर्चा करून उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर समितीचे माजी जिल्हाध्यक्ष यशवंत गायकवाड यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

दिवेआगारमध्‍ये पर्यटकांना सोईसुविधा...कोणत्‍या त्‍या वाचा

महिला सबलीकरण अभियानाविषयी बोलताना शाखेचे कार्याध्यक्ष संदीप गायकवाड यांनी व्यसनमुक्ती याविषयी मुलींशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुलींना व्हिडीओ व पीपीटीद्वारे विविध व्यसने यात दारू, तंबाखू, सिगारेट व इतर अमली पदार्थांची माहिती दिली. एखाद्याला व्यसन हे एक स्टेटस म्हणून करावे वाटते; पण नंतर त्याची त्याला सवय लागते. या व्यसनामुळे कोणकोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल बोलताना ते म्हणाले की, व्यसनांमुळे पैशाची नासाडी होते. संसारात ताणतणाव, वाद-विवाद होतात. मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. व्यसनाचा अतिरेक होऊन तो व्यक्ती मानसिक रुग्ण होतो आणि शेवटी कॅन्सरसारखा एखादा आजार होऊन व्यक्ती मृत्यू पावतो.

शाखेचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रमुख विठ्ठल पवार यांनी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. यानंतर शाखेच्या निधी संकलन प्रमुख प्रतिभा मंडावळे यांनी युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. व्यसनाचे गाणी व व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. 
याप्रसंगी वसतीगृहाच्या संचालिका कांचन जाधव व व्यवस्थापक आशा जाधव, तसेच शाखेच्या सभासद वैशाली कळसाईत यांसह वसतिगृहातील मुली उपस्थित होत्या.

मुंबईकरांनो ‘त्‍या’ आनंदी दिवसांसाठी सज्‍ज व्‍हा... कोणते ते दिवस वाचा...

व्यसन थांबवण्याचे पर्याय
ई-सिगारेट, निकोटेक्‍स यांचा वापर करून व्यसन थांबवू शकतो. व्यसनी माणसाच्या उपचारासाठी कोणत्याही बाबा, बुवा किंवा भक्ताकडे जावू नये, तर व्यसनमुक्ती केंद्रातच जावे. तसेच व्यसनी माणसांना व्यसन सुटण्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि कुटुंबाचा पाठिंबा गरजेचा असतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swear on Addiction to students