स्वाईन फ्लूचे सात रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

मुंबई -  मुंबईत या वर्षात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे सात रुग्ण सापडले आहेत. वाढती थंडी स्वाईन फ्लूच्या विषाणूला अनुकूल ठरल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

स्वाईन फ्लूची लागण झालेल्या सातही रुग्णांची प्रकृती ठीक असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. मुंबईत थंडीचा जास्त जोर नसल्याने स्वाईन फ्लूचा विषाणू फार काळ टिकाव धरत नाही. त्यामुळे घाबरण्यासारखी परिस्थिती येत नाही, असे साथरोग विभागाचे संचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. राज्यात इतर ठिकाणीही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असले तरी मृत्यूचे प्रमाण आटोक्‍यात आहे, असे ते म्हणाले.

यंदा राज्यभरात ३४८ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले. त्यापैकी २३ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू विदर्भ आणि पुण्यात झाले. विदर्भात १२ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्यात नागपूर, भंडारा आणि अमरावती या जिल्ह्यांतील रुग्ण होते.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: Swine flu seven patients in mumbai