स्वाईन फ्लूच्या लक्षणांत बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई - स्वाईन फ्लूच्या लक्षणांत झालेल्या बदलावरून स्वाईन फ्लूचा विषाणू बदलल्याचे स्पष्ट आहे. घसा दुखणे, श्वासोच्छवासाला त्रास होणे, अंगदुखी याचबरोबर काही रुग्णांना डायरिया झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. राज्यभरातील रुग्णांत हा बदल दिसत असला, तरी सूक्ष्मजीव शास्त्रानुसार ते सिद्ध झालेले नाही.

वरळीच्या आंबेडकर नगरमधील 18 महिन्यांच्या बाळाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता. त्या बाळालाही डायरिया झाला होता. राज्यभरातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांपैकी काहींमध्ये डायरिया हे स्वाईन फ्लूच्या लक्षणांबरोबर आढळून आल्याचे राज्यस्तरीय बैठकीत मांडण्यात आले आहे. यावरून स्वाईन फ्लूच्या लक्षणांत बदल झाल्याची नोंद केली आहे. हा स्वाईन फ्लूचा बदललेला स्ट्रेन सूक्ष्मजीव शास्त्रानुसार सिद्ध झालेला नाही, अशी माहिती महापालिकेच्या प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. राज्यातील सर्व्हेलन्स विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी आढळणारा स्ट्रेन हा मिशिगन स्ट्रेन म्हणून ओळखला जातो. गतवर्षी तो कॅलिफोर्निया स्ट्रेन होता.

यापूर्वी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लूच्या विषाणूत बदल नोंदवला असला, तरी ऑसेलटॅमीवीर हे औषध बदलण्याची आवश्‍यकता नसल्याचे सांगितले आहे.
जानेवारीपर्यंत राज्यात 181 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद आणि मृत्यू झाले आहेत.

Web Title: swine flu symptoms changes