नौदलाच्या धैर्याचं प्रतीक म्हणजे जहाजांचा 'अँकर', जहाजांच्या अँकरबद्दल रंजक माहिती...

सुमित बागुल
Wednesday, 5 August 2020

लोखंडी अँकर वापरायच्या आधी, अगदी पूर्वी एखाद्या बोटीला किंवा तेंव्हाच्या जहाजांना पाण्यात स्थिर उभं करण्यासाठी मोठाल्या दगडाचा वापर व्हायचा.

मुंबई : कुठल्याही जहाजासाठी अत्यंत महत्त्वाचं उपकरण म्हणजे त्या जहाजाचा नांगर.  अँकर म्हणजे जगातील नाविक दलांतील अधिकाऱ्यांसाठी धैर्याचं प्रतीक. म्हणूनच या 'अँकर' चिन्हाचा नाविकांच्या गणवेशात समावेश केला जातो. 

समुद्राच्या लाटांनी जहाज दिशाहीन होऊन भरकटू नये म्हणून आजही जहाजांच्या नांगराचाच वापर करतात. नांगर या शब्दापेक्षा 'अँकर' हा शब्द जास्त प्रचलित आहे. कदाचित जहाजाचा नांगर म्हंटल तर पटकन चित्र डोळ्यासमोर उभं राहणार नाही, पण बोटीचा किंवा जहाजाचा अँकर म्हंटलं की चटकन विशिष्ट आकृती डोळ्यासमोर येते.

जहाजांच्या नांगरांबाबत म्हणजेच अँकरबद्दल मराठीत फारसं कुठे लिहिलेलं किंवा त्यात वापरण्यात येणाऱ्या टेक्नॉलॉजिबाबत वाचायला मिळत नाही. म्हणूनच अजस्त्र जहाजांना एका जाही स्थिर ठेवणणाऱ्या अँकर्सबद्दल जाणून घेऊयात. 

लोखंडी अँकर वापरायच्या आधी, अगदी पूर्वी एखाद्या बोटीला किंवा तेंव्हाच्या जहाजांना पाण्यात स्थिर उभं करण्यासाठी मोठाल्या दगडाचा वापर व्हायचा. अनेकदा दगडांच्या ऐवजी शिसे भरलेल्या आकडेदार अशा लाकडी ओंडक्यांचा देखील वापर केला जात होता. 

​जहाजांच्या अँकर्सबद्दल हे कधी वाचलंय का ? 

 • संपूर्ण जहाजाला एका जागी, लाटांमध्ये उभं ठेवणं, स्थिर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
 • जहांवरील एकूण अँकर्सची संख्या, त्यांच्या दोऱ्या, अँकर्स आणि दोऱ्यांचं मटेरियल, त्याची लांबी, रुंदी, वजन हे विशिष्ट आकारमानानुसारच असावं लागतं. 
 • अँकरचं वजन जहाजाच्या बांधणीवर आणि जहाजाच्या वजनावर ठरत असतं. 
 • साधारण १२५ मीटर लांबीच्या अँकरचं (जोखडरहित) वजन हे २·७५ टन असावं असं मानतात. 
 • एका ३,००० टनाच्या जहाजावर पुढे तीन आणखी तीनअसे सहा अँकर्स असतात 
 • पुढील अँकरसाठीच्या दोरखंडांची लांबी ६० ते १२० मीटर असते.
 • अँकर्स खेचण्यासाठी यांत्रिक पुली म्हणजेच राहताच वापर केला जातो. 
 • एका अँकरवर अडकवलेलं जहाज हे त्याचा साखळदंड आणि जहाजाच्या लांबीच्या त्रिज्येत कुठेही सरकू शकतं. 
 • अनेकदा एखाद्या जहाजाचा वेग कमी करण्यासाठी अँकर्स टाकले जातात, यामुळे जहाजाचा वेळ लवकर कमी होण्यास मदत होते. 
 • जहाजाला अधिक स्थिरता देण्यासाठी एका ऐवजी दोन अँकर्स टाकले जातात. 
 • दोन्ही बाजूनी अँकर्स टाकले जातात 

अँकर्सचे प्रकार : 

आरमारी अँकर : साधारण तीनशे वर्षे आरमारी अँकर वापरात होता. यामधील नांगराच्या उभ्या दांड्याला हळस म्हणतात. या दांड्याच्या खालच्या टोकावर दोन आकडे असतात आणि त्या आकड्यांच्या टोकावर बदामी आकाराचे फाळ बसवले जायचे. हा अँकर पाण्यात सोडला की तो एका बाजूला कलंडायचा. अँकर तळाशी जाऊन त्यालतील फाळ खाली चिखलात रुतायचे आणि साखळीच्या अँकरच्या दांड्याला मदतीने  कलंडलेला फाळ चिखलात शिरतो. हळसाचे (मधल्या दांड्याचे)  वरचे टोक जहाजाला साखळीने टांगलेलं असतं. 

आ.१ आरमारी नांगर : (१) हळस, (२) आकडा, (३) फाळ, (४) जोखड.

 

मार्टिन अँकर : त्यानंतर आला मार्टिन अँकर. मार्टिन अँकर मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरला गेला. हा अँकर जमिनीवर पडल्या पडल्या आडवा पडून त्याचे फाळ जमिनीत रुततात. महत्त्वाची बाब म्हणजे हा अँकर परत जहाजावर घेताना फाळ काढावे लागत नाहीत. 

आ.२. मार्टिन नांगर : (१) हळस, (२) आकडा (३) फाळ, (४) जोखड.

 

स्मिथ अँकर : स्मिथ अँकर मार्टिन अँकरपेक्षा अत्याधुनिक आणि जास्त सोईस्कर आहे.याचे दोन्हीकडील फाळ पोलादी खुंटीवर सैलसे बसविलेले असतात. त्यामुळे ते फाळ हळसाच्या दोन्हीकडे ३०° ते ४५° सहज वळू शकतात. अँकर पाण्याच्या तळावर टेकल्याबरोबर दोन्ही फाळ आपल्या वजनानेच खुंटीभोवती फिरतात व चिखलात अडकतात.

आ. ३. स्मिथ नांगर : (अ) समोरील देखावा (आ) बाजूचा देखावा : (१) हळस, (२) आकडा, (३) फाळ (बाणाच्या दिशेने फाळ उचललेले), (४) खीळ.

( माहिती स्रोत - मराठी विश्वकोश )

symbol of naval courage is the anchor of ships interesting info about ship anchors

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: symbol of naval courage is the anchor of ships interesting info about ship anchors