प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा धूळ खात

सीएसएमटीचे हायटेक कॅमेरे बंद
corona update
corona updatesakal

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे; मात्र कोरोना अद्याप पूर्णतः संपलेला नसतानादेखील रेल्वे प्रशासनाकडून कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचेच प्रत्यंतर मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दिसून येत आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेले हायटेक कॅमेरे, फेब्रिआय कॅमेरा ऑपरेटिंग यंत्रणेचा चालू-बंदचा खेळ सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी ही यंत्रणा बंदच होती. त्यानंतर काही कालावधीसाठी सुरू केलेली यंत्रणा पुन्हा बंद असल्याचे दिसून येत आहे.

corona update
बाबा रामदेव अडचणीत! अॅलोपॅथी विरोधातील वक्तव्य भोवणार

गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या सीएसएमटीवर कोरोनाबाबत खबरदारी म्हणून फेब्रिआय कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याविना एकाच वेळी अनेक प्रवाशांचे तापमान मोजण्यासाठी या कॅमेऱ्याचा उपयोग होत होता; मात्र मागील अनेक दिवसांपासून येथील ऑपरेटिंग यंत्रणा बंद असल्याने हायटेक कॅमेरे बंद आहेत. परिणामी स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे तापमान मोजण्याची यंत्रणा धूळ खात पडून आहे.

या हायटेक कॅमेरा ऑपरेटिंग यंत्रणेवर महाराष्ट्र सुरक्षा दल किंवा रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी तैनात केलेला असतो; मात्र मागील तीन दिवस या ठिकाणी कोणीही दिसून आले नाही. ऑपरेटिंग यंत्रणेला टाळे दिसून आले. हा यंत्राणा सुरू करण्याची मागणी होत आहे.

उपाययोजना बंद करणे चुकीचे

कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांना प्रभावीपणे स्कॅन करण्यासाठी फेब्रीआय कॅमेरे जून २०२० मध्ये बसवले होते. ही प्रणाली कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून रेल्वे प्रवाशांसाठी विनास्पर्श सेवा देत होती; मात्र जून २०२१ मध्ये ही यंत्रणा बंद केली होती. यासह थर्मल स्क्रिनिंग, प्रवाशांचे तापमान मोजले जात नव्हते. प्रवाशांनी विचारणा केली असता पुन्हा यंत्रणा सुरू केली होती; मात्र आता पुन्हा ही यंत्रणा बंद केली आहे. परिणामी, कोरोना अद्याप संपलेला नसताना कोरोना उपाययोजना बंद करणे चुकीचे असल्याचे मत प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आले.

"रेल्वेने बंद केलेले हायटेक कॅमेरे पुन्हा सुरू करावेत. अद्याप मुंबईसह देश कोरोनामुक्त झाले नाही. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या प्रवाशांची चाचणी करणे, हायटेक कॅमेरेद्वारे त्याचे तापमान तपासणे सुरूच ठेवले पाहिजे."

- वंदना सोनावणे, अध्यक्षा, महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघटना

"हायटेक कॅमेरे आणि ऑपरेटिंग यंत्रणा का बंद आहेत, याबाबत आम्ही लक्ष देऊ. सध्या मुंबई महापालिकेद्वारे मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे तापमान मोजले जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केले जात आहे."

- ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com