esakal | Taj Lands End हॉटेलमध्ये गणपती प्रतिष्ठापनेवरून वाद; मूर्ती कुठे गेली? कर्मचाऱ्यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Taj Lands End हॉटेलमध्ये गणपती प्रतिष्ठापनेवरून वाद; मूर्ती कुठे गेली?

२००७ पासून Taj Lands End हॉटेलमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षी कोरोनामुळे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.

Taj Lands End हॉटेलमध्ये गणपती प्रतिष्ठापनेवरून वाद; मूर्ती कुठे गेली?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबईतील प्रसिद्ध Taj Lands End हॉटेलमध्ये गणपतीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेवरून वाद निर्माण झाला आहे. गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मूर्तीसह दोन तास गेटवरच उभा रहावं लागल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतरही कर्मचाऱ्यांकडून मूर्ती घेऊन व्यवस्थापनाने पुढे काय केलं हे माहिती नसल्याने आता हॉटेल व्यवस्थापन आणि कर्मचारी युनियनमध्ये वाद सुरु झाला आहे.

२००७ पासून Taj Lands End हॉटेलमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षी कोरोनामुळे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र यंदा मूर्ती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी आधी व्यवस्थापनाने केली होती. पण कर्मचारी जेव्हा मूर्ती घेऊन आले तेव्हा त्यांना गेटवरच अडवण्यात आलं. तब्बल दोन तास कर्मचारी मूर्तीसह उभा होते.

हेही वाचा: पिंपळाच्या झाडाखालील बाप्पा ते मंदिराच्या नगरीतील गणेश, जाणून घ्या महत्व

कर्मचाऱ्यांकडून मूर्ती दोन तासांनंतर व्यवस्थापनाने आपल्याकडे घेतली पण प्रतिष्ठापना केली नाही. तसंच मूर्ती कुठे नेऊन ठेवली हे माहिती नसल्याचं कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेवरून आता व्यवस्थापन आणि कर्मचारी युनियनमध्ये वाद सुरु आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनीही याबाबत व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला मोठं महत्त्व आहे. अशा महाराष्ट्रात गणपतीची मूर्ती अशी दोन तास बाहेर ठेवणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई करावी असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top