ताज हॉटेलमध्ये मोफत Valentine साजरा करता येणार? थांबा, आधी हे वाचा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

ताज हॉटेलमध्ये मोफत राहून व्हँलेटाईन वीक साजरा करण्यासाठीचे गिफ्ट कार्ड व्हॉट्सएप मॅसेजद्वारे तुम्हालाही आलंय का?

मुंबई : फेब्रुवारी महिना आला की 'व्हँलेटाईन विक'ची धामधुम सुरु होते. तरुणाईमध्ये उत्साह संचारतो आणि प्रेम ऋतूस बहर प्राप्त होतो. आपल्या मनातील आवडत्या व्यक्तीस आपलं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे व्हँलेटाईन डे. या व्हँलेटाईन डे भोवती भलं मोठं व्यावसायिक गणित पण उभं राहिलं आहे. तसेच, या दिवसात तीव्र झालेल्या भावनांचा वापर करुन फसवणुकीचे प्रकार देखील सर्रास होताना दिसतात. व्हँलेटाईन संदर्भातील असाच एक व्हायरल मॅसेज सध्या व्हाट्सएपवर धुमाकूळ घालतो आहे. यामध्ये व्हँलेटाईन विकमध्ये ताज हॉटेलमध्ये मोफत राहण्याची ऑफर देण्यात आली आहे. मॅसेजमध्ये एक कूपन अथवा गिफ्ट कार्ड असून त्याद्वारे एक आठवडा ताज हॉटेलमध्ये राहता येणार असल्याचा दावा आहे. मात्र, आता हा दावा चक्क ताज हॉटेलनेच स्पष्टीकरण देऊन खोडून काढला आहे. 

या मॅसेजमध्ये म्हटलंय की, मला ताज हॉटेलकडून एक गिफ्ट कार्ड मिळालं आहे. आणि मला ताज हॉटेलमध्ये व्हँलेटाईन विकमध्ये सात दिवस मोफत राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. या मॅसेजमध्ये लिहलंय की, ताज हॉटेलने व्हँलेटाईन विक साजरा करण्यासाठी 200 गिफ्ट कार्ड्स वाटले आहेत. आपण हे कार्ड वापरु शकता आणि सात दिवस मोफत हॉटेलमध्ये राहू शकता. आपल्याला फक्त यातील योग्य गिफ्ट बॉक्स ओपन करायचा आहे. आपल्याकडे तीन संधी आहेत. गुड लक! 

India Tv - Viral WhatsApp message

हेही वाचा - अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या भव्या लाल नासाच्या 'चीफ ऑफ स्टाफ'पदी
आपल्यालाही असा मॅसेज आलाय का? तर मग सावधान!
कारण आता यावर थेट ताज हॉटेलद्वारेच अधिकृतरित्या स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ताजने हा मॅसेज फसवा आणि दिशाभूल करणारा असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबतचं स्पष्टीकरण दिलं गेलं आहे. यात म्हटलंय की, एक वेबसाईटच्या गिफ्ट कार्डद्वारे व्हँलेटाईन विकला हॉटेलमध्ये मोफत आठवडाभर राहण्याचा दावा करणारा व्हॉट्सएप मॅसेज सध्या फिरतो आहे. आम्ही हे स्पस्ट करु इच्छितो की, याप्रकारची कसलीही ऑफर ताज हॉटेल किंवा IHCL कडून देण्यात आलेली नाहीये. यांची नोंद घ्यावी तसेच सावधानी बाळगावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taj isnt offering free stay during Valentines week confirms hotel