मोखाड्यात प्लास्टिक बंदीसाठी नगरपंचायतीची धडक कारवाई

plastic
plastic

मोखाडा (पालघर) : मोखाडा नगरपंचायतीने प्लास्टिक पिशव्या बंदी बाबत वारंवार सूचना देऊनही, प्लास्टिक पिशव्यांचा बाजारपेठेत सर्रास वापर होत होता. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मोखाडा नगरपंचायतीने संयुक्त कारवाई करून 5 व्यापाऱ्यांकडून 41 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून, सुमारे 25 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.  

शासनाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर, तसेच त्यांच्या विक्री वर बंदी घातली आहे. त्याबाबत प्रत्येक गावपातळीवर ग्रामपंचायती तसेच नगरपंचायतींना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने मोखाडा नगरपंचायतीने व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर तसेच विक्रीस बंद करण्याच्या लेखी सुचना दिल्या होत्या. असे असताना ही प्लास्टिक पिशव्यांचा बाजारपेठेत सर्रास वापर केला जात होता. अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या, तारापूर येथील उपविभागीय कार्यालय आणि मोखाडा नगरपंचायतीने बाजारपेठेत धडक कारवाई करत 5 किराणा दुकानातून 40 : 790  किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. तसेच त्या व्यापाऱ्यांकडून सुमारे 25 हजाराचा दंड ही वसुल केला असल्याची माहिती मोखाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील यांनी दिली आहे. 

या धडक कारवाईमुळे मोखाड्यातील सर्वच व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर या कारवाई चा तालुक्यातील इतर बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com