तळेगाव टोलनाका प्रकरण: पुण्यातील सर्वपक्षीय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला

तळेगाव टोलनाका प्रकरण: पुण्यातील सर्वपक्षीय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई: तळेगाव येथील सोमाटणे भागातील विविध पक्षाचे प्रतिनिधींनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचं निवासस्थान कृष्णकुंजवर ही भेट झाली आहे. सोमाटणे येथील टोल नाका बंद करावा या मागणीसाठी या नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान यावेळी २१ तारखेला उग्र आंदोलन करणार असल्याची माहिती दिली या सर्व सदस्यांनी दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याशी फोन वरून संपर्क साधला आणि उद्यापर्यंत माहिती देण्यास सांगितले. तसंच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

सोमाटणे येथे गेली १५ वर्ष स्थानिक रहिवाशी टोलनाका बंद करण्याची मागणी करत आहे. पण कंत्राट ११ वर्षासाठी दिला असा सांगून प्रशासन टोलवाटोलवी करत होते. कोरोना काळात पुन्हा एकदा नवे कंत्राट देण्यात आले आणि ते आयआरबीने जिंकले त्यामुळे हा टोलनाका बंद करा या मागणीसाठी हे लोक राज ठाकरे यांना भेटले.

सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आज राज ठाकरे यांची भेट घेतली. तळेगाव टोल नाका बाबात चर्चा केली आणि विनंती केली की आम्ही जो २१ तारखेला सर्वपक्षीय मोर्चा काढणार त्याला पाठींबा दिला आहे.  सोमाठणे फाटा आहे तेथील टोलनाका बंद करावा. आम्ही मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. राज ठाकरे यांना टोलबाबत चांगले काम केले आहे म्हणून त्यांच्याकडे आलो, अशी प्रतिक्रिया जनसेवा संघ समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्च्युत यांनी दिली आहे.

Talegaon toll plaza various parties Representatives meet Raj Thackeray

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com