कागदाचा आधार न घेता 15 मिनिटे बोलून दाखवा - नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

नरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांना प्रतिआव्हान 

संथेमरहळ्ळी/उडुपी - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुठल्याही कागदाचा आधार न घेता, कोणत्याही भाषेत कर्नाटकमधील सिद्धरामैया यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवावे, असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 1) दिले. 

नरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांना प्रतिआव्हान 

संथेमरहळ्ळी/उडुपी - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुठल्याही कागदाचा आधार न घेता, कोणत्याही भाषेत कर्नाटकमधील सिद्धरामैया यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवावे, असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 1) दिले. 

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीसाठी चामराजनगर जिल्ह्यातील संथेमरहळ्ळी येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकताना ते बोलत होते. "भ्रष्टाचार आणि अन्य मुद्द्यांवर मला संसदेत 15 मिनिटे बोलू द्या. मी संसदेत बोललो, तर पंतप्रधान 15 मिनिटेही बसू शकणार नाहीत', असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले होते. त्यावरून मोदी यांनी राहुल यांच्यावर प्रतिहल्ला केला. "मी कॉंग्रेस अध्यक्षांना हिंदी, इंग्रजी अथवा त्यांच्या मातोश्रींच्या मातृभाषेत, कागद हातात न घेता, कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारच्या कामगिरीबाबत 15 मिनिटे बोलण्याचे आव्हान देतो... कर्नाटकमधील नागरिक योग्य तो निष्कर्ष काढतील', असे ते म्हणाले. 
त्यांचे 15 मिनिटे बोलणेही मोठीच गोष्ट असेल. ते ऐकल्यावर मला बसणे शक्‍यच होणार नाही. कॉंग्रेस अध्यक्ष, महोदय आम्ही तुमच्यासमोर बसूच शकत नाही. तुम्ही "नामदार' आहात आणि आम्ही "कामदार' आहोत. तुमच्यापुढे बसण्याची आमची पात्रता नाही, असा टोला त्यांनी लगावला. 

मोदी उवाच... 
- देशाच्या इतिहासाबद्दल काडीचाही आदर नसलेल्या व्यक्तीकडे कॉंग्रेसचे नेतृत्त्व 
- "वंदे मातरम'चा त्यांनी केलेला अपमान पाहून मला धक्काच बसला 
- ज्या 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती, त्यांच्याविषयी देशात बहुतांश काळ सत्ता असलेल्या पक्षाने विचार का केला नाही? 
- जिथे जिथे कॉंग्रेस असते, तिथे तिथे विकासाचे रस्ते बंद असतात. तिथे फक्त भ्रष्टाचार आणि सामाजिक तेढ असते 
- प्रत्येक गावात 2009 पर्यंत वीज पोहोचवण्याची घोषणा 2005 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली होती. त्या घोषणेचे काय झाले? 
- येडियुरप्पा हेच कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील 

Web Title: Talk 15 minutes without giving any basis of paperwork - Narendra Modi